Part of the International conference on Maharashtra in September 2021 - Pankaj Jaiswal, SPPU, Pune
नवस्वातंत्र भारताला व महाराष्टाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून द्यायचे असेल तर शेती विकासाला चालना दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आधुनिक शास्त्रीय पद्धतीने शेती करण्याला अधिक महत्व देने व शेतीचे आधुनिक व शास्त्रीय तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे क्रमप्राप्त होते. यासाठी तत्कालीन कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुखांनी १९६० साली दिल्लीला पहिली इतिहासप्रसिद्ध जागतिक कृषी प्रदर्शनी भरविली.
जागतिक कृषी प्रदर्शनी भरविण्याचा मुख्य उद्देश, भारतातील तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती व्हावी, संकरीत बियाणांचा वापर कसा करावा, नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे, दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेतीविषयक आचार विचार समजून घ्यावेत, हा होता.
या प्रदर्शनीमध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोलंड, इराक, अफगाणिस्तान, सिलोन,म्यानमार, व्हिएतनाम, चीन, मंगोलिया व इराण इत्यादि देशांनी आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारे मंडप उभारून स्वदेशीय कृषी व अन्य उद्योगविषयक प्रगतीचे टप्पे आकर्षकपणे या मंडपात प्रदर्शित केले होते. तसेच युनोची आंतरराष्ट्रीय कृषी संघटना, आंतरराष्ट्रीय कृषी उत्पादकांची संघटना यांनीही आपापले प्रदर्शन कक्ष उघडून जागतिक स्तरावर अन्न व कृषी यांच्या प्रगतिकरिता काय काय करता येणे शक्य आहे याचे प्रत्ययकारी दर्शन घडविले होते. याचबरोबर केंद्रीय अन्न व कृषी मंत्रालयाचे विविध विभागांनी व विविध राज्यांनी आपापल्या प्रदेशातील कृषी व इतर उद्योगधंद्यांची शोभामंडपे लावली होती. तत्कालीन दोन महासत्ता अमेरिका व रशिया या राष्ट्रांनी कोट्यवधी रुपये खर्च करून आपल्या राष्ट्रातील कृषी व विज्ञान या क्षेत्रातील प्रगती दर्शवण्यासाठी आकर्षक व भव्य मंडप उभारले होते व त्यांना 'अमेरिकी मेला' व 'रशियन पव्हेलियन' ही नावे दिली होती जी कृषी प्रदर्शनातील प्रमुख आकर्षक स्थळे होती.
या जागतिक कृषी प्रदर्शनीला भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, जागतिक कृषिप्रदर्शनीचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हावर आणि रशियाचे अध्यक्ष बोरोशीलाव्ह, रशियन प्रधानमंत्री निकिता क्रुश्चेव, जर्मनी, पोलंड, नेपाळ, कंबोडिया इत्यादी देशांचे प्रधानमंत्री उपस्थित होते. या सगळ्या मान्यवरांनी आपल्या भाषणात वैज्ञानिक शेती व शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी त्याच्या उपयुक्ततेविषयी आपले मत व्यक्त केले.
भाऊसाहेबांनी भरविलेल्या या जागतिक कृषी प्रदर्शनीमध्ये तत्कालीन काळात उदयास आलेले शेतीविषयक यंत्र (उदा.ट्रॅक्टर, नांगरणी, इंजन), बी-बियाण्याच्या नवीन जाती, गायी, बैल,बकरी व म्हशींच्या संकरित जाती, तसेच विविध पिकांच्या लागवडी संदर्भाची माहिती, इत्यादी गोष्टी प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या. यामागील उद्देश एकच होता की येथील शेतकर्यांना आधुनिक यंत्राची व आधुनिक पद्धतीच्या शेतीची माहिती व्हावी व आपल्या विशिष्ट गरजा आणि परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक तो बदल करून त्याचा उपयोग शेतीमध्ये करावा. डॉ. पंजाबराव देशमुखांनी जगातील कृषी संशोधन, तंत्रशास्त्र, यांत्रिकीकरण, पशुपालन आणि कृषीमालाची गुणवत्ता या जागतिक कृषी प्रदर्शनीद्वारे भारतातील शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवले. प्रदर्शनीने प्रात्यक्षिके दाखवून विज्ञाननिष्ठा व प्रयत्नवाद शिकविला. भाऊसाहेबांनी कृषीक्रांती करण्यासाठी विश्वातील कृषिज्ञान येथील शेतकऱ्यांपर्यंत आणले.
या जागतिक कृषिप्रदर्शनीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला भाऊसाहेबांनी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिकाधीक संख्येने प्रदर्शनी बघण्यास व नवीन तंत्रज्ञान व पद्धती समजून घेण्यास प्रवृत्त केले. या प्रदर्शनीचा सकारात्मक परिणाम काही वर्षातच दिसून आला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान व आधुनिक पद्धतीचा उपयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्यास सुरुवात केली आणि काही वर्षातच महाराष्ट्रात हरित क्रांती घडून आली. महाराष्ट्र हे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण राज्य बनले याचे श्रेय हे डॉ. पंजाबराव देशमुखांनी भरविलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनीला जाते. ही जागतिक कृषी प्रदर्शन म्हणजे भाऊसाहेबांच्या कल्पकतेचे, दूरदृष्टीचे व शेतकऱ्यांच्या हितसंवर्धनाचे प्रतीकच होते.
या संशोधनासाठी दुय्यम पुस्तकासह कृषी मंत्रालयातील रेकॉर्डस्, सरकारी वार्षिक रिपोर्ट, विशेषांक इ. चा वापर करणार आहे.
Exchange of agricultural technologies
If new independent India and Maharashtra want to achieve economic stability, there is no alternative but to promote agricultural development. For this, more importance should be given to modern farming by using modern and scientific technology of agriculture. This modern technology should be passed on to all the farmers. To achieve this goal then Agriculture Minister, In 1960 Dr. Panjabrao Deshmukh organized the first World Agricultural Exhibition in Delhi.
The main aim of the World Agricultural Exhibition was to inform the farmers of India and Maharashtra about modern farming, how to use hybrid seeds, to understand new technologies, to understand the agricultural practices of other farmers.
In this exhibition, the countries like United States, Russia, England, Germany, Poland, Iraq, Afghanistan, Ceylon, Myanmar, Vietnam, China, Mongolia, and Iran, etc., set up their historical and cultural heritage stalls. Also, UNO's International Agricultural Organization, the International Agricultural Manufacturers' Association had opened their own stalls and demonstrated what can be done for the progress of food and agriculture globally. 'The American Fair' and the 'Russian Pavilion' were the major attractions in the agricultural exhibition.
President of India Dr. Rajendra Prasad, Prime Minister of India Pandit Jawaharlal Nehru, President of the World Agriculture Exhibition Dr. Panjabrao Deshmukh, Presidents of countries such as US President Eisenhower and Russia's President Boroshilav, Russian Prime Minister Nikita Kruschev, Germany, Poland, Nepal, Cambodia, and others were present. All these dignitaries expressed their views on scientific farming and its usefulness in the modern technology of agriculture.
In World Agricultural Exhibition, organized by Bhausaheb showcased information about agricultural cultivars (eg, tractors, plowing, engines), new seed varieties, breeds of cows, bulls, goats, and buffaloes, as well as information regarding the cultivation of various crops, etc. The purpose was to make the farmers aware of the modern machinery and methods of agriculture. Another aim was to take into account the specific needs of Indian farmers and make the necessary changes to use them in Indian agriculture. Through the World Agricultural Exhibition worlds agricultural he introduced new research, technology, mechanization, animal husbandry and quality of agriculture to the farmers of India. Bhausaheb brought farmers to the World Agriculture Exhibition for the revolution in the field of agriculture.
Farmers in Maharashtra responded tremendously to this global agrarian exhibition. The positive result of this exhibition was realized in a few years. The farmers of Maharashtra started using more technology and modern methods to produce more and more, and within a few years, a green revolution took place in Maharashtra. Maharashtra as a self-sufficient state for food credit goes to World Agricultural Exhibition organized by Panjabrao Deshmukh.
For this paper, government yearly reports, records from agriculture ministry will be used.